वाघीण का नाही दिसली !!🐯🐅
वाघीण का नाही दिसली ,
ताडोबाच्या घण जंगलांत
वाट तुझी पाहिली ,
पण तु का न दिसली ,
वाघीणी तु का न दिसली !!
सफर केली जीप्सीने
खाच खळग्यातुन पानथळातुन
उन्हा सावलीत,लाल धुळीत
धक्के खात फुट फुट उंच उडत
शोध तीचा घेत भटकलो रानी वनी
सांगा हो सातारकरांनो ,तरीही
वाघीण का नाही दिसली
वाघीण का नाही दिसली ,!!
प्रतीक्षा केली तिन कलाक
डोळेही क्षिणले प्रतिक्षेत ,
सांगा हो सहभागी मित्रांनो
वाघीण का नाही दिसली !!
रानमाकडे जिम्नॅस्टिक करित होती
हरणांचे कळप कान टवकारून ,
सावध एक मेका करित होती
रान गवे कळपाने दिसली ,
बाराशिंगे सावरत शिंगे ,
टक्कर देण्यासाठी सज्ज होऊन
एकमेका आव्हान करत होती .
कळप रानवराहांचे विसावली
जणू पसरला अखंड कातळ काळा .
पण वाघीण का नाही दिसली .!!
पक्षांचे थवे एका ओळीत उडत
आकाशी विहरत अतिरम्य दिसती ,
रान कोंबड्या,रान गाई ,रानगेंडे असंख्य ,ताडोब्यात असती .
मोरांचां फुलवुनी पिसारा
नाचणे अविरत चालु होते .
पण काही केल्या वाघीण
दर्शन देत नव्हती ,
एका सफारीला दोन बछड्यांचे
दर्शन झाले ,वार्ता होती
खात्रीपूर्वक कोणी सांगत नव्हते ,
मग मात्र माग काढणे सुरु झाले
विस सफरी एकवटल्या शोधायाला
दबा धरुन बसले श्र्वास रोखुन ,
संयमाची परिसीमा झाली ,
पुछ ही नदिसले त्या वाघीणीचे ,
ना तीची डरकाळी ऐकली
न जाणो कुठे पहुडली ही महाराणी !!
वाघीण का नाही दिसली
गड्यांनो वाघीण का नाही दिसली !!
भास्कर पवार पुणे .११ मार्च २०२४
(आपणही सांगा सहकार्यानो वाघीण का नाही दिसली )
No comments:
Post a Comment